
सौ.मीनल गानू,
(M.A.Sanskrit ,B.Ed, M.A. Music.)
गेली २७ वर्षे सतत संस्कृत विविध माध्यमातून शिकवीत आहे. त्यात SSC board च्या शाळेत ,CBSE school, Coaching class आणि स्वतः चा क्लास अशा ठिकाणी इयत्ता ५ वी ते १० वी तसेच ११ वी ,१२ वी पर्यंत च्या वर्गांना संस्कृत शिकवले आहे. संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा आहे आणि ती अधिकाधिक मुलांनी आत्मसात करावी तिची मधुरता सगळ्यांनाच मोहवणारी आणि अतिशय श्रीमंत भाषा आहे .एका शब्दासाठी १०० समानार्थी शब्द ज्या भाषेत आहेत अशी ही संपन्न भाषा. ही आपलीशी आपुलकीची वाटावी अशी ईच्छा.आपल्या ज्ञानभाषेची ओळख व्हावी आणि व्याकरणाची भीती दूर व्हावी अशी मनोमनी ईच्छा बाळगून मी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरवात केली . विद्यार्थ्यांची भाषेबाबतची वाढलेली गोडी हीच माझ्या शिकवण्याची पावती आहे असे मी समजते. तसेच त्यांची गुणवाढ त्यामुळे आपोआप होते. आपली संस्कृतीच मुळी संस्कृत आधारित आहे. भारताला समजून घ्यायचे तर प्रथम इथल्या मूळ भाषेला समजून घेणे आवश्यक. ह्या भूमिकेतून ह्या भाषेबाबत विद्यार्थांना जितके काही ज्ञान देता येईल ते देण्याचा सर्वस्वी प्रयत्न असतो .
कला
संस्कृत भाषे बरोबरच मी माझी शास्त्रीय आणि सुगम संगीताची आवड/कला सुद्धा जोपासते. गाण्याचे अनेक कार्यक्रम मी करते. प्रसंगानुसार १ ते १.५ तासांचे गाण्याचे ही कार्यक्रम मी करते. प्रोफेशनल कार्यक्रम सुद्धा मी करते.